नवोदय परीक्षा |उतारा वाचन आणि प्रश्नसंच-२

 उतारा वाचून त्यावर आधारीत प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा.


               गाव

गावात सर्वच प्रकारचे लोक वास्तव करून राहत असतात .प्रत्येकाचे जीवन एकमेकांवर अवलंबून असते.ते सहजीवन भागाव म्हणून गाव या घटकाची निर्मिती झाली. त्यात भावकी, नातेवाईक,जातीचे ,परजातीचे,प्रेमाचे,विरोधक असे अनेक घटक तयार झाले. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असणार यात शंका नाही परंतु जेव्हा सामाजिक कार्याचा विषय येईल तेव्हा  प्रत्येक व्यक्तींनी थोडे मागे पुढे हटणे गरजेचे असते किंवा ती काळाची गरज असते.त्याच वेळेस सम्यक विचाराची फार गरज असते कारण त्याचवेळेस होकारार्थी आणि नकारार्थी विचार सारखे कामाला लागलेले असतात पारडे कोणाचे जड भरेल हे त्या काळावर आणि परिस्थितीवर अवलंबून असतात. यात होकारार्थी विचारांचा विजय झाला तर सर्वांचाच फायदा होतो, परंतु नकारार्थी विचारांचा विजय झाला तर सर्वांचाच तोटा होतो किंवा ती भावी काळातील तोट्याची जननी ठरते आणि त्यानंतर सुरूवात होते हेव्यादाव्याला , एकमेकांना कमी लेखण्याला,एकमेकांचे नुकसान करण्याला आणि सामाजिक र्हासाला,याचेच रूपांतर एकाच्या कानी तर दुसर्याच्या तोंडी होते आणि कोणत्याही कारणावरून वाद होण्यास सुरुवात होते गावात गटबाजीला ऊत येतो आणि कोणतेही कारण नसताना निरपराध  लोक याचे बळी ठरतात आणि बाकीच्या लोकांना यांचे हसू ठरते पण त्यांनाही आपल्या अज्ञानाची कल्पना नसते की या आगीचा वणवा भडकून आपणही त्यात होरपळल्या जाणार . सोन्यासारख एकत्र नांदणार गाव या नकारार्थी विचारांमुळे आपल्याच माणसांकडे संशयास्पद नजरेने पाहू लागते कोणाचा कोणावर विश्वास राहत नाही अडीअडचणी ला एकमेकांसाठी उभी राहणारी माणसे दुर पळू लागतात या सर्व गोष्टींच्या वाईट अनुभवामुळे प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे दोष काढण्यात मग्न होतात. बघता बघता गावचे गावपण केव्हा हारविते हे गावकऱ्यांच्या लक्षात ही येत नाही कोणी पोलिस स्टेशन ची पायपीट करत तर कोणी कोर्टाचा उंबरठा झिजवत एकूण काय तर कोणी कोणाचा होणारा संबंध कसा मोडता येईल यासाठी प्रयत्न रथ दिसत. एकूणच जिरवा जिरवी च्या शडयंत्रात आपली किती जिरविल्या गिली हे कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो आणि आपल्या वर प्रेम करणारी माणसे आपल्या पासून दुर गेलेली असते
       आम्ही खरंच करणार का आत्मपरीक्षण की माणसे माणसाशी जोडलेले राहतील की गावाला गावपण राहील आणि हे नाही करता आले तरी चालेल पण किमान आम्ही होकारार्थी विचारांच्या बाजूने आहोत का नकारार्थी विचारांच्या बाजूने आहोत इतके आत्मपरीक्षण होणें गरजेचे आहे
   हा लेख कोणत्याही व्यक्तीवर नसून विचारांवर आहे .

           

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने