नवोदय उतारा वाचन प्रश्न

 पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


        उतारा क्रमांक-१   मुंगी'हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात, त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतात मुंग्याच्या सुमारे एक हजार जाती आढळतात.कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोच्या संख्येने मुंग्या राहतात. प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या,एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात. मुंग्या एकमेकाशी बोलत असतील का? कशाप्रकारे बोलत असतील? एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो? असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. आपण एकमेकांशी संवाद साधून माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादा करता विशिष्ट सोय करून दिली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंध गुणांचा उपयोग करतात.

 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने