दिशाज्ञान | दिशाज्ञान ट्रिक | Direction in geography

 || दिशा व उपदिशा||

            भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना नकाशा वाचन हे आपणास करावे लागते. नकाशा वाचन व्यवस्थित पणे करण्यासाठी आपणास दिशा ज्ञान असणे गरजेचे असते. दिशा या दोन प्रकारच्या असतात.  मुख्य दिशा आणि उपदिशा. आपल्या अभ्यासक्रमांमध्ये मुख्य दिशा चार सांगितलेल्या आहेत तर उपदिशा देखील चारच सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण मुख्य दिशांची नावे पाहूया. 

1】 मुख्य दिशा

1] पूर्व

2] पश्चिम

3] उत्तर

4] दक्षिण

वरील प्रमाणे मुख्य दिशा या चार आहेत. तरी या दिशा प्रत्यक्ष ओळखायच्या कशा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्य उगवतो ती दिशा पूर्व असते. आणि मावळतो ती दिशा पश्चिम असते. सूर्याकडे तोंड करून उभे राहिले असता आपल्या डाव्या हाताची दिशा ही उत्तर असते आणि उजव्या हाताकडील  दिशा ही दक्षिण असते. तसेच नकाशा मध्ये सूची दिलेली असते, आणि सूचीमध्ये एक बाण काढलेला असतो. बाणाच्या टोकावरती उत्तर दिशा दाखवलेली असते.तर नकाशाची किंवा कोणत्याही पुस्तकाची वरची दिशा ही उत्तर असते. खालची दिशा दक्षिण असते. आपल्या डाव्या हाताकडे दिशाही पश्चिम असते आणि उजव्या हाताची दिशा ही पूर्व असते.तर अशाप्रकारे आपण पुस्तकाच्या व प्रत्यक्षात जमिनीवरील  दिशांची माहिती याठिकाणी घेतली.

2】 उपदिशा

               कोणत्याही दोन मुख्य दिशांच्या मध्यभागी जी दिशा असते तिला उपदिशा असे म्हणतात. उपदिशा यांची नावे पुढीलप्रमाणे.

1] आग्नेय

2] ईशान्य

3] वायव्य

4] नैऋत्य

          वरील उपदिशा आणि मुख्य दिशा यांची स्थाने कशी लक्षात ठेवायची यासंबंधीची ट्रिक्स मी पुढील व्हिडीओ मध्ये दिलेली आहे तरी दिशा ज्ञान यावरील ट्रिक्स शिकण्यासाठी पुढील व्हिडिओच्या लिंक ला क्लिक करावे




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने