George Stephenson |जॉर्ज स्टीफन्सन

||जॉर्ज स्टीफन्सन||


1825 मधील गोष्ट. इंग्लंडमधील स्टॉक्टन ते डार्लिंग्टन यादरम्यान नवीनच बांधलेल्या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा गर्दी करून लोक उभे होते. कित्येकजण या नवीन प्रयोगाची फजिती पाहण्यास आले होते. या रेल्वेमार्गावरून जॉर्ज स्टीफन्सने संस्थेने विकसित केलेले इंजिन लावलेली 34 डब्यांची गाडी धडधडत जाणार होती. या डब्यापैकी काही डब्यात कोळसा होता. तर काही डब्यात चक्क माणसे बसलेली होती. स्वतः जॉर्ज इंजिन चालवणार होते. आधी असे अनेक प्रयोग झाले परंतु कधी मार्ग उघडला जाई तर कधी इंजिन बंद पडे.

       जॉर्जची आज खरी कसोटी होती. गाडीच्या पुढे एक घोडेस्वार दौडत जाणार होता. गाडीला हिरवा कंदील मिळताच गाडी सुरु झाली. सर्व जण श्वास रोखून पहात होते. गाडी ताशी 6 ते 8 मैल वेगाने जाऊ लागली. गाडीच्या पुढे धावणाऱ्या घोडेस्वराला त्याने बाजूला होण्यास सांगितले आणि इंजिनात भरपूर वाफ सोडली इंजिनाचा वेग वाढून तो 15 मैलापर्यंत जाऊन पोहोचला. जॉर्जचा प्रयोग खूपच यशस्वी झाला. जमलेल्या सर्वच लोकांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

          इंग्लंडमधील विलँम या गावी 9 जून 1781 रोजी जॉर्जचा जन्म झाला. वडील खाणीत फायरमनचे काम करत होते. पण परिस्थिती बेताची आणि घरात सहा मुले असल्यामुळे जॉर्जला शिक्षण घेता आले नाही. पण त्यांच्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार होते त्यांची महत्त्वाकांक्षा जागृत होती.

        लहानपणापासून गाई हाकण्याचे काम करून त्यांनी थोडेफार पैसे मिळवले. काही दिवसांनी त्यांना व त्यांचा भाऊ जेम्सला खाणीत काम मिळाले. परंतु त्यांचे समाधान होत नसे. त्यांना इंजिनियर व्हायचे होते आणि त्यांची इच्छा शेवटी पूर्ण झाली. एका खाणीत ते इंजिनियर म्हणून रुजू झाले. इंजिने चालवणे देखभाल करणे हे त्यांचे काम.इंजिन बंद पडले तर ते स्वतःच ते दुरुस्त करीत असे.

      त्याला बोल्टन आणि वॅट यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून इंजिना विषयी माहिती मिळवायची होती. त्यामुळे जॉर्जने नाईट स्कूल ला जाण्यास सुरुवात केली. त्यांची चांगली प्रगती होत होती. नोकरीतही त्यांची वरच्या पदावर बढती झाली होती. नियमित कमाईला जोड म्हणून ते चपला दुरुस्त करण्याचे काम करू लागले. अशाच एका दुरुस्तीला आलेल्या चपलांच्या मालकिणी शी त्यांचे लग्न झाले.

    दुर्दैवाचे त्यांच्यावर अनेक आघात झाले. त्यांची पत्नी वारली. त्यांच्या वडिलांना अपघात होऊन त्यांचे दोन्ही डोळे गेले. परंतु जॉर्ज डगमगले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांची सर्व कर्ज फेडली आई-वडिलांना घेऊन ते किलिंगवर्थलाआले. तेथे खाणीतील पाणी उपसायचा पंप बंद पडला. सर्वत्र पाणी भरले. काम सोडून सर्व कामगारांना बाहेर पडावे लागले. भल्याभल्या इंजिनीयर यांना तो पंप चालू करता आला नाही.जॉर्जने तो पंप चालू करण्याचे आव्हान स्वीकारले. आठवड्याभरातच त्यांनी पंप चालू केला आणि काम पुन्हा चालू झाले.

               आपला एकुलता एक मुलगा रॉबर्टला चांगले शिक्षण देण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी घड्याळे वगैरे दुरुस्त करून मिळवला. न्यूकासल येथे पिता-पुत्र दोघेही एकत्र शिक्षण घेऊ लागली.

         असा हा सुसंस्कृत संशोधक 12 ऑगस्ट 1848 रोजी हे जग सोडून निघून गेला.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने