संख्येची विस्तारीत मांडणी

 ||चला शिकूया संख्येची विस्तारित||


नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
                   गणित विषयांमध्ये संख्यांची मांडणी करत असताना, स्थानानुसार अंकलेखन करावे लागते. त्यानुसारच एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या,इ.संख्या तयार केल्या जातात. या स्थानामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार इत्यादी स्थानांचा समावेश होतो. प्रत्येक स्थानाची किंमत मागील लगतच्या स्थानाच्या दहा पटीने वाढत जाते. प्रत्येक स्थानामध्ये येणारे अंक यांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक असतो. एखाद्या संख्येच्या अंकांच्या स्थानिक किमतीची जर आपण बेरीज केली, तर आपल्याला तीच संख्या मिळते. अशाप्रकारे एखाद्या संख्येच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरजेच्या स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच "विस्तारित मांडणी" होय.  प्रत्येक संख्येची आपणास विस्तारित मांडणी करता येते. तरी विस्तारित मांडणी कशी करावी? संख्याची स्थानिक किंमत कशी काढावी? या विषयी मूलभूत असे मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे.तरी हा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटन ला क्लिक करा.







Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने