Sir Iassac Nutan|आयझॅक न्यूटन|Izac Nutan|scientist

|| सर आयझॅक न्यूटन ||


न्युटन यांचा जन्म 4 जानेवारी1643 रोजी इंग्लंडमध्ये वुल्सथाँरप येथे झाला. त्याचे वडील त्याच्या जन्मापूर्वीच वारले. शाळेत असताना तो अतिशय लाजाळू शांत होता. अभ्यासातही त्याची फारशी प्रगती नव्हती. त्यामुळे त्याच्याकडे फारशे कोणाची लक्ष नसे. परंतु पुढे आपल्या संशोधनामुळे त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. इसवी सन 1661 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. गणित ,प्रकाश विज्ञान, भौतिक शास्त्र आणि खगोल शास्त्र हे त्याचे खास आवडीचे विषय. मात्र सन 1665 मध्ये आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीमुळे विद्यापीठ बंद झाले आणि न्यूटनला वुल्सथाँरपला परतावे लागले तेथे पुढील दोन वर्षात त्याने अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली.इसवी सन 1667 मध्ये न्यूटन पुन्हा केंब्रिज येथे दाखल झाला. तेथे तो ट्रिनिटी कॉलेजचा सभासद झाला. दोन वर्षानंतर त्याची गणिताचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1672 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.एडमंड हँले या आपल्या मित्राच्या साह्याने लिहिलेल्या 'फिलॉसॉफी नॅचरँलिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका' या पुस्तकाची 1687 मध्ये प्रकाशित झाले आणि न्यूटन चे नाव जगभर झाले. मित्रांनो झाडावरून फळे पडताना आपण नेहमीच पाहतो, परंतु सफरचंद पडताना पाहून न्यूटनला अनेक प्रश्न पडले सफरचंद खाली पडली यावर संशोधन करून त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला. त्याचे गतीविषयक तीन नियम प्रसिद्धच आहे.
 त्याच्या या संशोधनामुळे तो भौतिक शास्त्राच्या पायाचा प्रणेता ठरला. त्रिकोणी काचेच्या लोलकातून जाणाऱ्या प्रकाशाचे सात रंगांचे पृथक्करण होते. हे त्यांनी सिद्ध केले. प्रकाशाचे परावर्तन याचा वापर करून त्यांनी सर्वप्रथम एक दुर्बिण बनवली. संवेगाच्या अक्षय्यतेचा नियम न्यूटनने मांडला. भौतिकशास्त्राप्रमाणेच त्यांचे गणितातील योगदान ही महत्त्वाचे आहे. डिफरेंसियल आणि इंटिग्रल कॅलक्युलस त्यांनी विकसित केले.सतराव्या शतकात आपल्या कर्तुत्वाने छाप पाडणारा हा महान शास्त्रज्ञ 31 मार्च 1727 रोजी हे जग सोडून गेला परंतु आपल्या संशोधनाने अमर झाले.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने