James Watts|जेम्स वॅट

 ||जेम्स वॅट||


जेम्स वॅट चा जन्म 19 जानेवारी 1736 रोजी ग्रीनाँक, स्कॉटलांड येथे झाला. त्यांचे वडील जहाज बांधणीचे काम करीत. त्यांच्याकडून जेम्स लहानपणीच सुतारकी शिकला. मात्र त्याला गणितात रस वाटेल त्याचे शालेय शिक्षण तसे यथातथाच झाले. परंतु त्याच्या आईने त्याला घरीच शिक्षण दिले. आपणही काही उपकरणे बनवावी असे त्याला वाटे. परंतु ग्रीनाँक मध्ये त्याला त्यासंबंधीचे शिक्षण मिळण्याची सुविधा नव्हती.1754 मध्ये जेम्स ग्लासगो येथे गेला तेथे त्याची ग्लासगो युनिव्हर्सिटीत संशोधक म्हणून काम करणाऱ्या रॉबर्ट डिक यांच्याशी गाठ पडली. रॉबर्ट डिकने जेम्स च्या अंगी असलेले कौशल्य नेमके हेरले. जेम्स ने उपकरणे बनविण्या संबंधी विशेष शिक्षण घेण्यासाठी लंडनला जावे. असे रॉबर्टने सुचवले. जेम्स लंडनला गेला तेथे त्याने अप्रेंटिसशिप मिळावी म्हणून दोन आठवडे प्रयत्न केला. परंतु प्रत्येक ठिकाणी नकार मिळाला. कारण तेथील नियमानुसार फक्त योग्य प्रशिक्षण घेतलेल्यांना आज अप्रेंटीसशिप मिळत असे.मात्र तीव्र इच्छा असेल तर मार्ग सापडतो. या उक्तीचा जेम्सला प्रत्यय आला. जॉन मॉर्गन या सद्गृहस्थाने नियम धाब्यावर बसून जेम्सला कामावर घेतले. परंतु अतिशय कमी मोबदल्यावर, जेम्सनेही तेथे कठोर परिश्रम घेतले आणि थोड्या अवधीतच त्याने आपले प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केले. तुटपुंजी कमाई आणि प्रचंड कष्ट यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला. तो पुन्हा ग्लासगोला परत आला ग्लासगो युनिव्हर्सिटीतील त्याच्या ओळखीच्या प्राध्यापकांनी त्याला लगेचच काम दिले.

 

                        जेम्स ने कारखाना चालू करण्याची तयारी केली. पण इतर व्यवसायिकांनी विरोध केल्यामुळे अखेरीस त्याने युनिव्हर्सिटीच्या आवारातच काम सुरू केले. हा त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा कालावधी होता. त्याने वाफेच्या गुणधर्मावर संशोधन सुरू केले. कालांतराने अप्रकट ऊष्मा चा शोध लावला. मार्च 1776 मध्ये त्याने पहिले वाफेचे इंजिन तयार केले.11 मार्च1776 या वृत्तपत्रात या इंजिना विषयी पुढील प्रमाणे वृत्त छापून आले. पहिल्या क्षणापासूनच इंजिन व्यवस्थित चालू झाले एका मिनिटाला त्याचे चौदा ते पंधरा फेरे होत होते आणि एका तासाच्या आतच 90 फूट (सुमारे 27.5 मीटर ) खोल खड्ड्यातील पाणी उपसून पूर्ण झाले. या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले. 25 ऑगस्ट 1819 रोजी जेम्सचा मृत्यू झाला.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने