मराठी व्याकरण|Marathi Grammar|शब्दाच्या जाती

||शब्दांच्या जाती||


मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करत असतांना आपल्याला शब्दांच्या जातीचा अभ्यास करणे आवश्यक असते. मराठी भाषेमध्ये एकूण शब्दांच्या आठ जाती आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद,विशेषण, क्रियाविशेषणअव्यय,शब्दयोगी अव्यय,उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. या जातींपैकी काही जाती विकारी आहेत. तर काही जाती अविकारी आहेत. म्हणजेच सांगायचे तात्पर्य असे की या शब्दांच्या जाती म्हणजे एक प्रकारचे शब्दच असतात. त्यांनाच विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे आपण समजतो. तर विकारी शब्द म्हणजे असे शब्द की ज्यांचा वाक्यात वापर करतांना त्यांच्या मूळ रूपात बदल करावा लागतो किंवा तो बदल होतो. त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. तर अविकारी शब्द म्हणजे ज्यांचा वाक्यात उपयोग करत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल करायची आवश्यकता नसते. तर ते जशेच्या तशे वाक्यामध्ये आपणास वापरता येतात. तरी या ठिकाणी विकारी आणि अविकारी शब्दांची आपण माहिती घेतली. तसेच या सर्व शब्दांवरती मी व्हिडिओ ची मालिका तयार केलेली आहे. अतिशय सोप्या आणि सुगम शब्दांमध्ये या शब्दांच्या जातींची माहिती मी या व्हिडिओमध्ये सादर केली आहे. तरी आपणास ज्या शब्दांच्या जाती विषयी माहिती जाणुन घ्यायची आहे. त्या शब्दाच्या नावा खालील गुलाबी रंगाच्या क्लिक बटन ला क्लिक करुन व्हिडिओ पहू शकता.

1] नाम




2] सर्वनाम





3] क्रियापद





4] विशेषण





5] क्रियाविशेषण






6] शब्दयोगी अव्यय






7] उभयान्वयी अव्यय





8] केवलप्रयोगी अव्यय





 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने