Maha School GIS ॲपवर शाळांचे Geo Tagging करण्याबाबत महत्त्वाची सूचना
राज्यातील सर्व शाळांची माहिती भौगोलिक पद्धतीने नोंदविण्यासाठी “Maha School GIS” ॲपच्या माध्यमातून Geo Tagging करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राज्यातील २३९८ शाळांचे Geo Tagging अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित शिक्षणाधिकारी, अधीक्षक वेतन पथक तसेच मुख्याध्यापक यांनी प्रलंबित शाळांची Geo Tagging प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
शाळांनी काय करावे?
प्रलंबित यादीतील शाळांनी Maha School GISॲपवर Geo Tagging पूर्ण करून शाळेची भौगोलिक माहिती अद्ययावत करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित शाळांना सूचना देऊन ही कार्यवाही वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
Geo Tagging पूर्ण करण्याची अंतिम मुदत : १३ एप्रिल २०२६
शाळांनी आपले नाव प्रलंबित यादीमध्ये आहे किंवा नाही, याची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
संपूर्ण आदेश पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा.
महा स्कूल ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी पुढील इन्स्टॉल बटन वर क्लिक करा.
महा स्कूल जीआयएस अँप चे युजर मॅन्युअल डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वर क्लिक करा.
