School Bag Policy 2020 ची शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आदेश

School Bag Policy 2020 ची शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आदेश

 


संदर्भ :- १. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, Department of School Education & Literacy यांचे पत्र क्र. F.No.१-४/२०१८-IS-३, दि. ११ मे, २०२६


२. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, Department of School Education & Literacy यांचे पत्र क्र. F.No.१-४/२०१८-IS-३. दि. २४.११.२०२०


3. National Council of Educational Research and Training (NCERT) यांची Policy on School Bag-२०२०


उपरोक्त संदर्भीय School Bag Policy, २०२० धोरणानुसार, विदयार्थ्यांच्या शालेय दप्तराचे वजन कमी करणे, विदयार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व कृतीप्रधान करणे आवश्यक आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे होण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


१. शाळांच्या मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना School Bag Policy, २०२० मधील तरतुदींची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

२. दप्तराचे वजन विदयार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन होणार नाही, याची दक्षता शाळांनी घ्यावी. धोरणामध्ये वर्गनिहाय विदयार्थी वजन व अपेक्षित दप्तर वजनाचा मार्गदर्शक तक्ता देण्यात आलेला आहे.

शाळांनी विदयार्थ्यांचे व दप्तराचे वजन वेळोवेळी तपासून नोंद ठेवावी व ज्या विदयार्थ्यांचे दप्तर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी.

३. पूर्व-प्राथमिक स्तर पूर्व-प्राथमिक वर्गातील विदयार्थ्यांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता राहणार नाही, याबाबत शाळांनी नियोजन करावे.


४. पाठ्यपुस्तके व वह्यांची संख्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी विदयार्थ्यांना अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका किंवा इतर साहित्य दररोज शाळेत आणण्यास सांगू नये.


दैनंदिन वेळापत्रकानुसार त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके व शैक्षणिक साहित्य विदयार्थ्यांनी आणावे, यासाठी वर्गनिहाय दप्तर वेळापत्रक (Bag Timetable) तयार करावे.


५. शाळेत पुस्तके ठेवण्याची व्यवस्था शक्य असल्यास शाळांनी विदद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय कपाटे, शेल्फ, लॉकर किंवा पुस्तके ठेवण्याची अन्य सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता राहणार नाही.


६. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यास विदयार्थ्यांना अनावश्यकपणे जड पाण्याची बाटली आणण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा कार्यरत व पुरेशी असल्याची खात्री करावी.


७. वेळापत्रकाचे नियोजन शाळेचे साप्ताहिक वेळापत्रक तयार करताना एकाच दिवशी विदयार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तके व वह्या आणाव्या लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.


विषय शिक्षकांनी आपापल्या विषयासाठी आवश्यक साहित्याची संख्या कमी ठेवून शक्य तितक्या कृतीप्रधान व अनुभवाधारित अध्यापन पद्धतीचा वापर करावा.


८. गृहपाठ व शैक्षणिक साहित्य विदयार्थ्यांना अनावश्यक लिखित गृहपाठ, अतिरिक्त वह्या, प्रकल्प साहित्य किंवा इतर साहित्य आणण्यास सांगून दप्तराचे वजन वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.


९. Bagless Days / दप्तरविरहित दिवस


इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी NEP २०२० व School Bag Policy, २०२० नुसार १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी नियोजित करून स्थानिक पातळीवरील कारागीर, व्यावसायिक व कौशल्याधारित व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबवावेत.


यामध्ये सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कला, स्थानिक व्यवसाय, कृषीविषयक उपक्रम इत्यादींचा समावेश करता येईल. केंद्र शासनाने इयत्ता ६ ते ८ मध्ये अशा १० दिवसांच्या bagless period ला विशेष प्रोत्साहन दिले आहे. १०. दप्तरविरहित उपक्रम शाळांनी वर्षभरात नियोजनपूर्वक खालीलप्रमाणे दप्तरविरहित/कृतीप्रधान दिवस आयोजित


करावेत :-


कला व हस्तकला उपक्रम


क्रीडा व शारीरिक शिक्षण


प्रश्नमंजुषा व बौद्धिक खेळ

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने