PM-POSHANयोजनेअंतर्गत शाळांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकी व मदतनीस नियुक्तीचे आदेश; शिक्षण विभागाचे महत्त्वाचे पत्र

PM-POSHANयोजनेअंतर्गत शाळांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकी व मदतनीस नियुक्तीचे आदेश; शिक्षण विभागाचे महत्त्वाचे पत्र




केंद्रिय स्वयंपाकगृहांतर्गत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचा लाभ घेत असलेल्या शाळांमध्ये स्वतंत्र १ स्वयंपाकी तथा मदतनीस नियुक्त करणेबाबत.


संदर्भ: - १) शासन निर्णय क्र. शापोआ २०१०/प्र.क्र.१८/प्राशि ४ मंत्रालय मुंबई ४०० ०३२. दि. ०२/०२/२०११


२) दिनांक २६/०५/२०२५ रोजीच्या प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीचे दिनांक ०२/०६/२०२६ रोजीचे इतिवृत्त.


३) केंद्र शासनाच्या २०१७ मधील मार्गदर्शक सुचना.


उपरोक्त् विषयाच्या अनुषंगाने आपणांस सुचित करणेत येते की, आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळांना केंद्रिय स्वयंपाकगृहांतर्गत आहार पुरवठा केला जातो अशा शाळांमध्ये मुलांना आहार वाटप करणे, जेवणाची ताटं धुणे, जेवणानंतर परिसराची स्वच्छता करणे इ. कामकाजासाठी प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र मदतनीसची आवश्यकता आहे.

त्यासाठी यापूर्वी केंद्रिय स्वयंपाकगृहासाठी नियुक्त करणेत आलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस वगळून केंद्रिय स्वयंपाकगृहांतर्गत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्या शाळांमध्ये पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा जास्त आहे अशा शाळांमध्ये स्वतंत्रपणे एका स्वयंपाकी तथा मदतनीस ची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती करणेत यावी.

१) नियुक्ती करताना प्रचलित नियमांनुसार दरमहा २५००/- मानधन तत्त्वावर १० महिन्यांसाठी करावी.

२) संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन प्रचलित नियमांनुसार संबंधितांच्या खात्यावर वर्ग करणेत यावे.

३) संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे काम उपरोक्त संदर्भ क्र.१ व्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.९ नुसार योजनेपुरते मर्यादित राहील याची दक्षता घेणेत यावी.

४) स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या नियुक्तीबाबत यापूर्वी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

वरीलप्रमाणे कार्यवाही करून खालील तक्यामध्ये अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा. विलंब होणार नाही याची दक्षता घेणेत यावी

या पत्रापूर्वी कार्यरत असलेल्या स्वयंपाकी/मदतनीस यांची संख्या

या पत्रानुसार नव्याने

नियुक्त केलेल्या स्वयंपाकी/मदतनीस यांची संख्या

एकूण स्वयंपाकी/मदतनीस यांची संख्या

Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 16-06-2026 16:11:05

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१) मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई.

२) मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य,



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने