शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन / ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करणेबाबत...

शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन / ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करणेबाबत.....



 

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०६/टीएनटी-१, दि. २३-०८-२०२४

२. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणेबाबत अहवाल दि. २५-०२-२०२५

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. ०१ अन्वये शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने सूचना निर्गमित

करण्यात आलेल्या आहेत. तसेच शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा

अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ अंतर्गत नमूद अनिवार्य कामे याप्रमाणे कामांचे वर्गीकरण केले आहे. संदर्भ क्र. ०२

अन्वये शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणेबाबत अहवाल शासनास सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळास्तरावरील

विविध समित्यांचे एकत्रीकरण करुन ०४ समित्या तयार करण्यात आल्या. तसेच U-DISE + व SARAL प्रणालीचे एकत्रीकरण

करुन एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय PM Poshan योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम

कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्हयासाठी पथदर्शी अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारे राज्यस्तरावरुन

शिक्षकांचा शैक्षणिक बाबीं संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

तथापि सद्यस्थितीत केंद्रशासनाच्या / राज्यशासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल Online / Offline स्वरुपात

शाळास्तरावरुन द्यावा लागतो. तसेच जिल्हास्तर/तालुकास्तर/केंद्रस्तरावरही माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे

शिक्षकांचा अध्ययन-अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व Online / Offline स्वरुपात माहिती सादर करण्यात जात

असल्याचे निदर्शनास येत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पन्हाळा, जिल्हा - कोल्हापूर, आष्टी जिल्हा-बीड, अक्कलकुवा,

जिल्हा नंदूरबार, एटापल्ली जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये 'माहितीचा वार शनिवार' या

उपक्रमाची पथदर्शी स्वरुपात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये आठवडयाभरात जी काही माहिती Online / Offline

स्वरुपात मागितली होती, ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करणेबाबत कळविले होते. सदर पथदर्शी अभ्यासाचे विश्लेषण

पुढीलप्रमाणे :-

i. सदर उपक्रमाबाबत ९० टक्के शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.

ii. शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत ९६.६ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले.

iii.

सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका झाली.

शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला / विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली.

iv.

उपरोक्त नमूद सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकांचा दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व

सादर करण्यात जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून माहिती सादर करणेबाबत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

आहेत.

१. वरिष्ठ कार्यालयांकडून शालेय स्तरावर मागितलेली माहिती / विविध उपक्रमांचे अहवाल अशा प्रकारची कोणतीही

ऑनलाईन (अॅप, पोर्टल, लिंक इत्यादी वरील) माहिती अथवा ऑफलाईन (पत्र, ई-मेल इत्यादी) माहिती शाळांनी दर

शनिवारी सादर करावी.

२. राज्य / विभाग / जिल्हा/तालुका / केंद्र स्तरावरुन त्या त्या आठवडयात मागितलेली विषयानुरुप माहिती सर्व

मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्या आठवडयातील शनिवारी सादर करावी.

३. याबाबत पुढील माहिती अपवाद असेल. सदर माहिती दररोज त्याच दिवशी सादर करणे आवश्यक असेल.

i.VSK पोर्टल वरील विद्यार्थी उपस्थिती

ii.PM Poshan पोर्टल वरील आहार दिलेल्या विद्यार्थी संख्येची नोंद

विद्यार्थी सुरक्षा, विधीमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांचेशी संबंधित माहिती.

iii.४. राज्य / विभाग / जिल्हा/तालुका / केंद्र स्तरावरील कोणतेही अधिकारी यांनी तात्काळ माहिती मिळावी / शनिवार व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरु नये / माहिती मागवू नये.

उपरोक्त नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन / ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याच्या अनुषंगाने तात्काळ आपले स्तरावरुन सर्व शाळांना सूचना द्याव्यात व त्यानुसार कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी.

शासनाचे  अधिकृत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील वर क्लिक करा. 

                  Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने