"शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबविणेबाबत...
संदर्भ: १. शासन निर्णय क संकीर्ण- ११२५/प्र.क्र.२५२/एसएम, दि १२.०३.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसं/ शाळा प्रवेशोत्सव /८०२/ दिनांक १९.०५.२०२६
३. शासन पत्र क्र संकीर्ण ११२५/प्र.क्र.२५२/एस.एम-१, दि १०.०६.२०२६
४. मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे याचिका क्र ४०६७/२०२६ मधील दिनांक १०.०६.२०२६ चे आदेश
"शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात राज्य मंडळाच्या शाळा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व लातूर या शैक्षणिक विभागात सोमवार दिनांक १५/०६/२०२६ पासून आणि नागपूर व अमरावती विभागातील (विदर्भ) शाळा दिनांक ३०/०६/२०२६ पासून सुरु होणार आहेत. सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्र २ च्या पत्रान्वये
सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र ३ दिनांक १०.०६.२०२६ च्या पत्रान्वये शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम मूळ नियोजनाप्रमाणे व वेळापत्रकाप्रमाणे राबविणेबाबत व या उपक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान आदर्श
आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची अत्याधिक दक्षता घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्र ३ अन्वये दिलेलया निर्देशांचे तंतोतंत पालन करावे.
"शाळा प्रवेशोत्सव" या उपक्रमांच्या नियोजनासाठी आपल्या जिल्हयामध्ये "शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन करावा. सदर कक्षामध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करावी. विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १५.०६.२०२६ पासून शाळा
सुरु होत असल्याने दिनांक १३ व १४ जून २०२६ रोजी व विदर्भातील शाळा दिनांक ३०.०६.२०२६ रोजी सुरु होत असल्याने दिनांक २८ व २९जून २०२६ रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशात्सव कक्ष सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. शाळा प्रवेशोत्सवाबाबत
आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच राज्यस्तरावरुन मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी.
"शाळा प्रवेशोत्सव" हया उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला सरल प्रणालीमध्ये school portal ला भेटीचा
अहवाल नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. मान्यवर लोकप्रतिनिधी (मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग),
मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री, मा. खासदार,
मा.आमदार व इतर मा. लोकप्रतिनिधी ) तसेच सनदी अधिकारी यांचे शाळा भेटीचे (४ ते ५ फोटो ) व ३ ते ४ मिनिटांचा व्हीडीओ या
कार्यालयास स्वतंत्रपणे सादर करावा. विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक १५.०६.२०२६ व विदर्भामध्ये दिनांक ३०.०६.२०२६
रोजी भेट देणा-या मा. लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटीची सरल प्रणालीमध्ये नोंद करावयाची आहे. सदर नोंद
त्याच दिवशी घेण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे. सदर सुविधाही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी
संध्याकाळी ६.०० वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरणेबाबत सर्व सबंधीतांना कळवावे.
जिल्हयामध्ये झालेल्या एकूण शाळा भेटींचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद यांनी पुढील नमुन्यात
राज्यस्तरावर सादर करावा.
शाळा प्रवेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विद्या कार्यपुस्तिका Pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
