नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस...
विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत.
संदर्भ- १. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४
२. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/३६०५ अ, दिनांक ०५/१०/२०१७
३. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४ / एस.डी.- ४ दि. १६/०४/२०२५
४. शासन शुद्धिपत्रक क्रमांक: संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४ / एस.डी.- ४दि. १७/०६/२०२५ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र. ०२ येथील परिपत्रक दिनांक ०५/१०/२०१७ अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.संदर्भ क्र.३ येथील दि.१६/०४/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून टप्प्या - टप्प्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन. २०२५ - २६ पासून इ. १ली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची
अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संदर्भ क्र. ३ येथील दि. १७/०६/२०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या
शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी (नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने) सुधारित
विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
सदर तरतूदी सन.२०२५-२६ पासून लागू असतील.
अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा.
