बाल चित्रकला स्पर्धा | महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी महत्त्वाची सूचना

बालचित्रकला स्पर्धा 2026: महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू, 8 ऑगस्ट रोजी स्पर्धा



संदर्भीय शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला

स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा

परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे.महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या

संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.





मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद / नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी किंवा शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी या संकेतस्थळावरील बालचित्रकला याटॅबमध्ये https://www.msbae.ac.in

https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भरावयचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.

शाळा नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

                Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने