बदली अपडेट - शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२५ ग्रामविकास विभागाचा आजचा आदेश.

बदली अपडेट २०२५ - शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२५ ग्रामविकास विभागाचे 13/05/2025 चा आदेश.


Gajanan


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 13 मे 2019 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया 2025 बाबत न्यायालयीन याचिकेचा संदर्भ देऊन पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र. ५२०६/२०२५ व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०५.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. तसेच संदर्भ क्र. २ येथील शासन समक्रमांक दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक ३ येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.


२. उपरोक्त न्यायनिर्णयाद्वारे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करुन त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची आपणांस विनंती आहे.


आपली,


(नीला रानडे)

 उप सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत माहितीस्तवः-


१) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.


Download

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने