SQAAF Registration Link 128 Standards To be filled...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे.
त्या अंतर्गत शाळा मूल्यांकनासाठी शाळा सिद्धि ऐवजी आता शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये शाळा प्रथम स्वयं मूल्यांकन करणार आहे व त्यानंतर शाळांची बाह्य मूल्यांकन होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश निर्गमित करून तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
त्यासाठी शाळांना अगोदर दिलेल्या लिंक वर जाऊन शाळांची नोंदणी करायची आहे लिंक पुढीलप्रमाणे.
वरील लिंक वर गेले असता पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते.
त्यासाठी प्रथम खाते तयार करा वर क्लिक करा त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपल्या शाळेचा अधिकृत ई-मेल आयडी टाका आपल्या सोयीनुसार पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाईप करा..
सदर ई-मेल आयडी हा तुमचा या पोर्टल साठी यूजर आयडी असेल तर तुम्ही निवडलेला पासवर्ड हा पुन्हा लॉगिन करण्यासाठी आवश्यक असेल.
खाती तयार करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदवलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक प्राप्त होईल.