वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करणेबाबत.
Gajanan
“महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील नियम क्र. २ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. सदर नियमातील क्र. २ ( ३ ) ( तीन ) अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये “महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्याची निवड करता येईल” अशी तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय
कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात सदर बाबत दिनांकासहीत नोंद असणे आवश्यक आहे.तथापि, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, बरेचदा विवाहीत महिला शासकीय कर्मचारी “तिच्या आई-वडीलांची किंवा तिचे सासू-सासरे यापैकी एकाची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता निवड केली आहे” असे त्यांच्या कार्यालयास संबंधितांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी केल्यानंतर कळवितात. तसेच अनेकदा याबाबतच्या सेवापुस्तकातील नोंदीत सदर नोंद कोणत्या
दिनांकापासून घेण्यात आली आहे, याचा उल्लेख नसल्याने संबंधित वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचे प्रकरण
निकाली काढताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे याबाबत नव्याने स्पष्ट आदेश निर्गमित करण्याची
बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
आता, सदर शासन निर्णयान्वये खालील आदेश देण्यात येत आहेत.(अ) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी
एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यापुर्वी “ त्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता निवड केली आहे” असे अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक आहे.(ब) उपरोक्त (अ) संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात अर्जाबाबत दिनांकासहीत नोंद घेणे बंधनकारक आहे.(क) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने “आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी
एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी ती करीत आहे”, असे ज्या दिनांकास
कळविले आहे, त्या दिनांकापासून केवळ पुढील कालावधीत संबंधितांनी (१) आई-वडील किंवा (२)
सासू-सासरे या दोघांपैकी एक यांनी) घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्ती शासनाकडून
करण्यात येईल. म्हणजेच ज्या कालावधीतील उपचार खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी विवाहीत
शासकीय महिला कर्मचारी करीत आहे, त्या कालावधीत संबंधितांच्या सेवापुस्तकात सदर व्यक्तीची
(१) आई-वडील किंवा (२) सासू-सासरे या दोघांपैकी एक यांची) नोंद असणे आवश्यक आहे.
(ड) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील (अ) प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा
कालावधीत त्याच्यात कसलाही बदल करता येणार नाही.
२.हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.
३. हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांनादेखील लागू करण्यांत यावा, मात्र यापुर्वीच निर्णित
ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यांत येऊ नये.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१२१२१३२४२१५४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अधिकृत शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.