शिक्षक बदली अपडेट..
संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी म्हणून एक युनिट चा लाभ देणेबाबत....
उपरोक्त विषयावरील आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, बदली अधिकार
प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये पती-पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल, तर
त्यांनी दिलेल्या ३० प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे. यापैकी एका
शिक्षकाची बदली करता येणार नाही. त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही. सबब, बदली अधिकार प्राप्त
शिक्षकांच्या बदल्या ( टप्पा क्र. ४) या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये एक युनिटचा
लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती-पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम
विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी.
शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.