How to download e-pan card 2.0

डाऊनलोड करा नवीन पॅन कार्ड 2.0 आपल्या मोबाईलवर. 


नमस्कार मित्रांनो 
                   नुकतेच केंद्र शासनाने शासनाच्या आयकर विभागाने पॅन कार्ड 1.0 बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नवीन पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे तर हे नवीन पॅन कार्ड 2.0 की ज्यामध्ये बारकोड असणार आहे असे बारकोड असलेले पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा. 
सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करा . त्यानंतर NSDL असे टाईप करून सर्च करा. त्यानंतर पुढील पेज आपनाला दिसेल.

         



Gajanan 

वरील पेजवरील पहिल्याच  लिंक वरती क्लिक करा नंतर आपणास पुढील पेज दिसेल.


वरील पेजवरील डाउनलोड ई पॅन कार्ड की जे ऑप्शन दाखवले आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करा. नंतर आपणास पुढील पेज दिसेल. 

             


वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे पॅन या ऑप्शनवर टिक करा नंतर या पेज वरती स्वतःचा पॅन नंबर आधार कार्ड नंबर डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती भरा आणि पुढील पेज साठी कंटिन्यू करा. नंतर आपणास पुढील पेज दिसेल. 


आपण भरलेली सर्व माहिती या पेजवर दाखवली जाईल ती एकदा चेक करून घ्या आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करा. नंतर पुढील पेज दिसेल. या पेजवर तुम्हाला पेमेंट करायचे आहे पेमेंट जास्त नाही फक्त 8 रुपये 26 पैसे पेमेंट करावे लागणार आहे हे पेमेंट तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शनने करू शकता संबंधित ऑप्शन या पेजवर दाखवलेले आहेत किंवा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता.





पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर आपले ई-पॅन कार्ड आपल्या रजिस्टर ईमेल आयडीवर मेल केली जाईल तसेच आपण केलेल्या पेमेंटची पेमेंट स्लिप पीडीएफ स्वरूपात आपण याच पेजवरून डाऊनलोड करून घेऊ शकतो. तर अशाप्रकारे आपण आपले ई पॅन कार्ड डाऊनलोड करू शकतो. वरील सर्व माहिती व्हिडिओच्या स्वरूपात पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा. 




                                Click Here 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने