कोण आहेत बाबा आढाव?
Who is Baba Adhav?
पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव यांचे पुर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असून ते असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत.
प्रकाशित साहित्य संपादन
१) एक गाव, एक पाणवठा
२) सत्यशोधनाची वाटचाल
३) हमाल पंचायत
४) रिक्षाचालक संघटना
बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.