एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा-बोली भाषा परीक्षेतुन सूट मिळण्याबाबत...
शासन सेवेतील काही पदांसाठी हिंदी बोली भाषा परीक्षा विहित करण्यात आली आहे. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हिंभाप-१०८०/१३१ / वीस, दिनांक २५ मे १९८१ अन्वये माध्यमिक शालांत परीक्षा हिंदी हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हिंदीच्या निम्न व उच्च श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली
आहे. प्रस्तुत आदेशात हिंदी निम्न व उच्च श्रेणी परीक्षेबरोबर हिंदी बोली भाषा परीक्षेचा उल्लेख
नसल्यामुळे ज्या कर्मचा-यांना बोली भाषा परीक्षा विहित करण्यात आली आहे त्यांना सदरहू आदेशा-न्वये हिंदी बोली भाषा परीक्षेतून सूट मिळत नाही. तरी जे कर्मचारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा हिंदी विषय (१०० गुण) घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी बोली भाषा परीक्षेतून सूट देण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. रा. कुलकर्णी-उप सचिव,
महाराष्ट्र शासन.