जनगणना २०२१ होणार....
जनगणना २०२१ महोदय/ महोदया,सर्व जिल्हे / तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्याबाबत.
संदर्भ : क्रमांक: जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.
उपरोक्त विषयायावत संदर्भाधिन दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ ची अधिसूचना आवश्यक कार्यवाहीस्तव
सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर
अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.
“शुध्दिपत्रक”
जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ९-७-२०१९- CD (Cen), दिनांक ८ ऑक्टोबर, २०२४ नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
“सर्व जिल्हे/तहसील/शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जुलै, २०२४ ऐवजी
दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्यात येतील."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उर्मिला सावंत,
शासनाचे अवर सचिव.
शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा.