STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ देणे बाबत..| Online Training

STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ देणे बाबत..





STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्ससाठी मुदतवाढ देणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत. 

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.राशैसंप्रपम/संशोधन / ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४ आणि ०५५०९ दि.१८/११/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व 

अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a

तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर 

कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.३०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या कमी असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दि.१०.१२.२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.


(अनुराधा ओक)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे..

प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांसाठी एकूण प्रत्येकी विषयानुसार पाच - पाच प्रशिक्षणांची निर्मिती करण्यात आलेली आहे.आपणास हवे आहे त्या प्रशिक्षणापुढील लिंकवर आपण क्लिक करुन किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपले प्रशिक्षण पूर्ण करु शकता.(परंतु मित्रांनो क्लिक करण्यापूर्वी प्रथम आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा ॲप  इन्स्टॉल केलेले असावे)


 

अधिकृत शासनाचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 


              Click Here 


सदर प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर रजिस्ट्रेशन कसे करावे हे समजून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 



              Click Here 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने