नॅशनल आयडी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे!
नमस्कार मित्रांनो,
यु-डायस पोर्टल वरील स्टुडन्ट मॉडूल अपडेट करत असताना मागील वर्षी तसेच या वर्षी देखील काही विद्यार्थ्यांची नोंदणी करायची राहून गेलेली आहे. या नोंदणी राहिलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल आयडी मिळालेला नाही. तरी मध्यंतरीच्या काळामध्ये संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणी ही जिल्हास्तरावरून करण्यात येणार होती. परंतु नवीन आलेल्या परिपत्रकानुसार आता ही नोंदणी तालुकास्तरावरील माननीय गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून केली जाणार आहे. तरी या नोंदणीसाठी लागणारी माहिती आपल्याला एका पत्रकाद्वारे द्यावयाचे आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीचे संकलित प्रपत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.