जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देखील ग्रामपंचायतीकडून शिपाई मिळण्याची शक्यता! शासन आदेश जारी..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देखील ग्रामपंचायतीकडून शिपाई मिळण्याची शक्यता! शासन आदेश जारी..



नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत स्तरावरील शिपाई या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील तीन दिवस गावातील शाळेत सेवा देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 61 अन्वये ग्रामपंचायतींना त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. तसेच मुंबई ग्रामपंचायत नोकरांबाबत (सेवेच्या शर्ती) नियम, 1960 मधील नियम 5 अन्वये पंचायतीच्या नोकराने, सरपंचाने नेमून दिलेली कामे केली पाहिजेत असे नमुद आहे.


या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, ग्रामपंचायत स्तरावरील शिपाई या पदावर काम करणारा कर्मचारी हा गावातील व कार्यालयातील साफ सफाईचे काम करतो परंतु शाळेतील साफसफाई करत नाही.




त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, ग्रामपंचायत स्तरावरील शिपाई या पदावर काम करना-या कर्मचा-याने आठवडयातुन तिन दिवस शाळेतील साफसफाईचे काम करावे असे आदेश ग्रामपंचायत स्तरावर नियमानुसार निर्गमित करण्याबाबत आपल्या स्तरावरून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी कळवावे. ग्रामपंचायत स्तरावर निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाची प्रत पंचायत समिती स्तरावर एकत्र करून या कार्यालयास सादर करावेत. या कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.


उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) जिल्हा परिषद, नांदेड.

संबंधित शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड या बटणावर क्लिक करा.

     

                  डाऊनलोड 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने