वर्ग दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस पोर्टलवर नोंदणी केलेली नसेल तर काय करावे?

वर्ग दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस पोर्टलवर नोंदणी केलेली नसेल तर काय करावे?



 


यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत.

सन २०२१-२२ या मागील वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्याची सविस्तर नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु असे दिसून आले आहे, की शाळेत शिक्षण घेत असुनही बऱ्याच विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. त्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थी जे सध्या त्याच शाळेत शिक्षण होत आहेत त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. विद्यार्थी नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे :-




• आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे.




माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे.




• शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नाही.




याबाबत आपणास कळविण्यात येते की, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांची माहिती न नोंदविण्याबाबत खुलासा घेण्यात यावा व त्या शाळांची माहिती व खुलासा सोबत दिलेल्या लिंकवर भरण्यात यावा त्यानंतर जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.


इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असलेल्या शाळांची माहिती दि.२५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सोबतच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात यावी. आपला प्रतिसाद नोंदवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

              

                    CLICK HERE 








वरील लिंक मध्ये मुख्याध्यापकाने जे प्रमाणपत्र भरून अपलोड करायचे आहे ते प्रमाणपत्र. 


                        Download


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने