शिक्षकांसाठी घेतली जाणार परीक्षा ! Exam for Teacher

शिक्षकांसाठी घेतली जाणार परीक्षा ! Exam for Teacher



 

शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. विद्यार्थ्याना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी, याहेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची  सहविचार  सभा आयोजित करण्यात आली. प्रस्तुत समेत विविध शिक्षक संघटनांनी आपली भुमिका विषद करत शिक्षक प्रेरणा परीक्षेस अनुमोदन दिले. त्याअनुषंगाने औरंगाबाद विभागांतर्गत येणान्या शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी पर्यतच्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे प्रस्तूत परीक्षा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा व सर्व संबंधितांनीआयोजन करावे. असे आदेश विभागीय आयुक्त यांनी दिले आहे




खालीलप्रमाणे परीक्षेसंबंधी कार्यवाही पार पाडावी,




विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष विभागीय आयुक्त


सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद


सदस्य उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद


सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग


सदस्य विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग 


विभागस्तरीय संनियंत्रण समितीचे कर्तव्ये व जबाबदान्या :-


1. प्रश्नपत्रिका तयार करणे व प्रश्नपत्रिकेची प्रत सीलबंद स्वरुपात जिल्हा परीक्षा संनियंत्रण समितीस सुपूर्द करणे.


2. समिती सदस्यांनी विभागीय आयुक्त यांचे मान्यतेने जिल्हयांना पत्रव्यवहार करणे 




जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष जिल्हाधिकारी


सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)


सदस्य अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद


सदस्य प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था




आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) :-


अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद


सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक)


सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


आर्थिक नियोजन समितीची कर्तव्ये व जबाबदान्या


प्रस्तुत परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई ओएमआर मशिनवर उत्तरपत्रिका तपासणी व उत्तीर्ण परीक्षार्थीसाठी प्रमाणपत्र छपाई, बक्षीसवस्तु व इतर अनुषंगीक बाबीवर येणाऱ्याखर्चाचे आर्थिक नियोजन करणे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका उपाई. सिलिंग, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसाठी कस्टडी रूम 


5.2उपरोक्त बाबीची जबाबदारी खालील समितीवर सोपवावी.


अध्यक्ष अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक)


सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


ओएसआर मशीन उपलब्धता, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल इ. - उपरोक्त बाबांची जबाबदारी खालील समितीवर सोपवावी.


अध्यक्ष प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास


यंत्रणा, जिल्हा परिषद सदस्य उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद


सदस्य उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)-2


केंद्रनिश्चिती, बैठक व्यवस्था, परीक्षा संचलन सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी :-


प्रस्तुत बाबीची जबाबदारी खालील समितीवर सोपवावी. अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि.), जिल्हा परिषद


सदस्य - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद


सदस्य उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) 2


जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समितीची कर्तव्ये जबाबदान्या :- 


1. प्रस्तुत परीक्षा ही शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करून त्यांचे विषयज्ञान वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने घेण्यात येत असुन यापरीक्षेचा त्यांचे सेवाविषयक बाबींवर कुठलाही परिणाम होणार नाही. यादृष्टीने घेण्यात येत असलेसंबंधी संबंधितांना जाणीव करुन द्यावी.


2. जिल्हयातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांमधील इ.1 ली ते 10 वी या वर्गाना अध्यापन करणाऱ्या व शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादीसह संख्या अंतिम करावी. (याकामी शिक्षकांकडून अनुमोदन मागवून परीक्षेसाठी संख्या निश्चिती करावी)


3. शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक नसणान्या शिक्षकांची यादी करून संख्यानिश्चित करावी.


परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल, परीक्षेकामी पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल.


• उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरुपाच्या असतील. सदर उत्तरपत्रिकांची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल. उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्र. नोंदवून घेतला जाईल.उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा. उत्तर पत्रिकेवर उत्तर नांदवितानाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावरदेण्यात याव्यात.


● परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यापर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थितीअहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करून जिल्हाकक्षाकडे सुपूर्द करतील. परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करुन परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची .विषयनिहाय यादी तयार करेल (गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून वजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल.) परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल. • अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षाथ्र्यांची जावे, उत्तीर्ण परीक्षाथ्र्यांची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करावा.गुणानुक्रमे जिल्ह्यातुन प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा.


परीक्षेसाठी अभ्यासक्रम :-


इ. 5 वी ते 12 वी पर्यतच्या SCERT/ NCERT पाठ्य पुस्तकांमधील भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील. उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.


परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालुन परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील.

संबंधित परीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇

 

DOWNLOAD 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने