बदली अपडेट -महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्यात करण्यास मुदतवाढ देणे बाबत | Extension for transfer of Various cader

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्यात करण्यास मुदतवाढ देणे बाबत दिनांक 30 मे 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.



 


शासन निर्णय :-


महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, सन २०२३ - २४ या चालू आर्थिक वर्षातील दि. ३१ मे, २०२३ पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. ३० जून, २०२३ पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५३०१६५०४३४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संबंधित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

 

Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने