आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शाळा कोणती निवडावी??? School Selection for child education.

आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शाळा कोणती निवडावी???
School Selection for child education.


        नमस्कार मित्रांनो,
मी तुम्हाला आज जी गोष्ट शेअर करणार आहे,त्या गोष्टीमुळे तुमची येणारी पीढी संस्कारी बनणार आहे की ज्यामुळे तुमचे म्हातारपण अतिशय आनंदात जाणार आहे.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितले आहे की तुम्हाला जर एका वर्षाची पेरणी करायची असेल तर धान्य पेरा आणि जर तुम्हाला शंभर वर्षांची पेरणी करायची असेल तर माणसं पेरा.त्यांच्या सांगण्याचा उद्देश आपल्या लक्ष्यात आलाच असेल की माणसांची पेरणी करणे म्हणजे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे होय.जर मुलांना दर्जेदार शिक्षण दिले तर ते सुजान व सुसंस्कृत नागरिक बनतील.आता हे तर निश्चित झाले की आपण मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे.परंतु मुलांना चांगले शिक्षण कोठे मिळेल?.हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.तर आज आपण याच विषयावर या ब्लॉग मध्ये चर्चा करणार आहोत.
              आपल्या भारत देशात तद्वतच महाराष्ट्र राज्यांत अनेक माध्यमांच्या शाळा आहेत.जसे की
* मराठी माध्यम
* इंग्रजी माध्यम
* सेमी इंग्रजी माध्यम
तसेच जर परीक्षा मंडळाच्या माध्यमातून विचार केला तर
* स्टेट बोर्ड च्या शाळा.
* सी.बी.एस.सी बोर्डच्या शाळा.
* आय.सी.एस.सी. बोर्डच्या शाळा.
* नवोदय विद्यालय.
* सैनिक शाळा.
  असे अनेक पर्याय सध्या आपल्या राज्यात उपलब्ध आहे.मग अशा परीस्थितीत आपण शाळा निवडायची कोणती? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे.ती गोष्ट वाचल्यानंतर तुम्हीच ठरवू शकाल की आपला पाल्य आपल्याला कोणत्या शाळेत शिकवायचा आणि त्याला शिक्षण कोणते द्यायचे ते ?

 

           असे समजा की संपूर्ण समाज ही शाळा आहे आणि या शाळेतील विद्यार्थी हे पशुपक्षी आहेत. या शाळेत गरुड, बदक, कोकिळा,ससा इ.सारखे विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. या शाळेत एकदा पोहण्याच्या आणि धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. साहजिकच या स्पर्धेत बदक पोहण्याच्या तर ससा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आले. त्यांचा सत्कार करण्यात आला.परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे सुचविले की पुढच्या वर्षी या स्पर्धेत गरुड, कोकिळा यांनी देखील प्राविण्य कमावले पाहिजे. त्यानुसार तयारी सुरु झाली.सस्याला पोहण्याचा सराव, बदकाला धावण्याचा सराव, गरुड गाण्याचा सराव करु लागला तर कोकिळा उंच उडण्याचे प्रात्यक्षिके करु लागली. वर्षभर सर्व विद्यार्थ्यांनी चांगला सराव केला. वर्षाच्या शेवटी परीक्षा झाली तर बदकाला धावता तर आले नाही परंतु या नादात तो पोहणे मात्र विसरून गेला. असेच गरुड, कोकिळा, ससा यांच्याबाबतीत झाले.त्यांच्या जवळ असलेल्या कौशल्यात देखील ते काठावर पास झाले. मित्रांनो सांगायचे तात्पर्य हेच आहे की आपल्या मुलाला/मुलीला शाळेत टाकतांना त्यांच्या अंगी असणार्या सुप्त गुणांना हेरुन त्यांच्या या गुणांना जी शाळा चांगल्या प्रकारे न्याय देवू शकेल तीच शाळा आपण निवडावी. 

         समजा तुम्ही आपल्या पाल्यांतील सुप्त गुण शोधले ? परंतु परत तुमच्या पुढे तोच प्रश्न उभा राहिला असेल की शाळा कोणत्या माध्यमाची निवडावी.तर आताच झालेल्या नविन संशोधनानुसार विद्यार्थ्यांचे
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे.म्हणुन मी माझ्या सर्व वाचकांना विनंती करेल की किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे.परंतु मातृभाषेतून शिक्षण घेत असतांना त्या शाळेत इंग्रजी व हिंदी या भाषेचे देखील अध्यापन झाले पाहिजे.अशीच शाळा तुम्ही आपल्या पाल्यांसाठी निवडली पाहिजे.
     धन्यवाद!

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने