सन 2022 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गंत बदल्या रद्द झाल्यात का शंका समाधान ! | Teacher transfer in 2022 is it cancelled!

सन 2022 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गंत बदल्या रद्द झाल्यात का शंका समाधान !


शिक्षक बदली प्रक्रिया 2022 सुरू असलेल्या चर्चा व त्यावरील स्पष्टीकरण.. 

बदल्या रद्द झाल्या का? 

नाही! तर कार्यमुक्त कधी करणार? 

Phase-3 जिल्हांतर्गत बदली
मागील आठवड्यात 6 व्या टप्प्यात अवघड क्षेत्रात बदली झालेल्या 272 शिक्षकांच्या बदल्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर 6 वा टप्पा व 2022 ची संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द होणार असे मेसेज समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
◆मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 272 याचिककर्त्यांच्या बदलीला अंतरिम (तात्पुरती) स्थगिती दिली आहे.
◆राज्य सरकार त्यावर 4 मे रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांचं म्हणणं मांडणार आहे.6 वा टप्पा राबवताना काही चुका झाल्याचं न्यायालायचं म्हणणं आहे. त्यावर राज्य सरकार स्पष्टीकरण देईल.
◆7 जून रोजी यावर सुनावणी होऊन त्याच दिवशी याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
◆अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यास न्यायालय विरोध करणार नाही. मात्र प्रक्रिया योग्य रितीने राबविण्यासाठी निर्देश मिळू शकतील.
◆या स्थगितीचा 2022 च्या संपूर्ण बदली प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.
◆मा. उपसचिव, ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक 24.02.2023 च्या पत्रानुसार बदली झालेल्या सर्व शिक्षकांना (याचिकाकर्ते 272 शिक्षक वगळून) 01 ते 15 मे या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यमुक्तीचे आदेश देतील.
◆या सर्व शिक्षकांना 16 ते 31 मे या कालावधीत नवीन शाळेत हजर व्हावे लागेल.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने