जनगणना केलेल्या कालावधीच्या बदली रजा देणेबाबत चे परीपत्रक....

जनगणना केलेल्या कालावधीच्या बदली रजा देणेबाबत चे परीपत्रक....




परिपत्रक - 

मे-जून २०१० या कालावधीत जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचा-यांना बदली रजा मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.मे-जून २०१० या उन्हाळी सुटीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असेल त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल तेवढे दिवसांची रजा जमा करावी . त्याचप्रमाणे ज्या शिक्षक संवर्गातील कर्मचा-यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी बदलीरजा उपभोगता आली नाही त्यांना त्या बदली रजा २०१०-११ या शैक्षणिक वर्षात नेहमीच्या अटीवर उपभोगण्यास किंवा सदरची रजा त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात जमा करण्यास मंजूरी देण्यात येत

आहे.मात्र जनगणनेच्या कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र संबंधीत प्रधान जनगणनाअधिकारी किंवा जनगणना चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना सदरची रजा अनुज्ञेय होईल.

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, त्याचा सांकेतांक

क्रमांक २०१०१०२९१४३३३४००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

  परीपत्रक Pdf स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


          DOWNLOAD 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने