जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीसंदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत.
प्रस्तावना :
संदर्भ क्र.१ येथील दि.०४.०२.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसाठी कार्यान्वित केलेल्या संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करुन त्यामध्ये काही सुधारण करणे, अथवा सुधारित धोरण निश्चित करणे गरजेचे आहे काय, याबाबत अभ्यास करुन शिफारस करण्यासाठी श्री. आयुष प्रसाद (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या
अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीस अनुसरुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना अध्यापनाचे काम करतांना उद्भवणाऱ्या अडचणी विचारात घेऊन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत/आंतरजिल्हा बदल्यांसाठी दिनांक ७.४.२०२१ रोजीच्या संदर्भ क्र. २ येथील स्वतंत्र शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु आहे. सदर ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना प्रत्येक टप्प्यावर विविध शिक्षक संघटनांकडून अनेक सूचना/निवदने शासनास प्राप्त झाले आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी आव्हानित करणाऱ्या विविध रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत.यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र.४ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा.उच्चन्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय
निर्गमित करुन समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीत कोण कोण सदस्य असणार आहे.हे स्पष्ट केले आहे. सदरचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.