राहुल भैया केंद्रे यांना राज्यस्तरीय वंजारी समाजभूषण पुरस्कार जाहीर

राहुल भैया केंद्रे यांना राज्यस्तरीय वंजारी समाजभूषण पुरस्कार जाहीर


 मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 29 जानेवारी ला होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण



 


 उदगीर प्रतिनिधी -


 राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून वंजारी समाजाचे नाव उंचावल्याबद्दल लातूर जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांना राज्यस्तरीय वंजारी समाज भूषण पुरस्कार 2022 हा जाहीर झाला असून 29 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे विविध मान्यवरांच्या हस्ते राहुल भैया केंद्रे यांना गौरविण्यात येणार आहे.



 अखिल भारतीय वंजारी युवा संघटन, संपूर्ण वंजारी समाज मुंबई यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाचे नाव उंचावल्याबद्दल  पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लहाने, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, एनएसडी नवी दिल्लीचे मा.संचालक वामनरावजी केंद्रे, लातूर जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, बबन नवनाथराव सांगळे उद्योगपती, पुणे. शांतीवन चे संस्थापक  व संचालक दिपकराव नागरगोजे यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


 महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये राहुल भैया केंद्रे यांनी आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी चळवळीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राहुल भैया केंद्रे यांनी केली उदगीर नगर परिषदेमध्ये सर्वात कमी वयाचे महाराष्ट्रातील नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये विविध कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. पक्षाने पुढे त्यांना नगर परिषदेमध्ये सभापती पदाची संधी दिली.


 9 ऑगस्ट  2008 रोजी ऑगस्ट क्रांती दिन भारतीय जनता पार्टीतर्फे करत असलेल्या आंदोलनामध्ये शिवाजी चौक उदगीर येथे पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेले राहुल केंद्रे यांनी जनसेवेसाठी मी कायम  रस्त्यावर उतरेन असा ठाम निर्धार त्याच वेळी केला होता.


 भारतीय जनता पार्टीने पुढे जाऊन त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत महाराष्ट्रभर पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी दौरे केले.पक्षाने विविध प्रशिक्षण आयोजित केली होती त्याच्यामध्ये सहभाग घेतला. प्रश्नांची जाण व ते सोडवण्यासाठी असलेली प्रचंड तळमळ याद्वारे राहुल केंद्रे यांनी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले.


 'प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व शेवटी स्वतः'  या ब्रीद वाक्यानुसार गेल्या वीस वर्षापासून राहुल भैया केंद्रे हे पक्षाची विचारधारा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे करत आहेत.


 2017  साली पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोहारा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या साठी राहुल केंद्रे यांना संधी दिली.


 महाराष्ट्रातील सर्वात तरुण वयाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहुल केंद्रे जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर स्थायी समिती सारख्या महत्त्वपूर्ण समितीमध्ये पक्षाने  यांना काम करण्याची संधी दिली.

 तत्कालीन ग्रामविकास मंत्री मा.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून प्रचंड निधी त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये खेचून आणला व ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचे जाळे विणले.


 सहा जानेवारी 2020 रोजी पक्षाने लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल भैया केंद्रे यांना संधी दिली.

 यामध्येही सर्वात कमी वयाचे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र मध्ये काम करत असताना राहुल भैया केंद्रे यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले. वंजारी समाजाची  मान उंचावली.

 अशा या नेतृत्वाला वंजारी समाजभूषण पुरस्कार 2022 जाहीर झाला असून मुंबई येथे त्याचे वितरण 29 जानेवारी 2023 रोजी  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व माजी मंत्री धनंजय मुंडे  यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.राहुल केंद्रे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने