जय जय महाराष्ट्र माझा|महाराष्ट्र गीत|इ.७वी मराठी कविता|Jay jay Maharashtra maza

 जय जय महाराष्ट्र माझा



 
जय जय महाराष्ट्र माझा, 

गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ।।


रेवा वरदा, कृष्ण कोयना, 

भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी 

मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या 

यमुनेचे पाणी पाजा ॥१॥


भीति न आम्हां तुझी मुळीही

 गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला,

 जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,

 शिव शंभू राजा

दरीदरींतुन नाद गुंजला,

 महाराष्ट्र माझा ॥२॥


काळ्या छातीवरी कोरली, 

अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती,

 खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तक्त राखितो

 महाराष्ट्र माझा ||३||

महाराष्ट्र गीत चालिवर पाहण्यासाठी पुढील लिंकला टिचकी मारा.


 




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने