पंचमहायज्ञ कोणते?What are Pancha Mahayagna.

 पंचमहायज्ञ कोणते?



पंचमहायज्ञ हे मानवाला जन्मताच असणारे कर्ज आहे. आपल्या उत्पन्नाचा काही भाग (५-१०%) तरी या पंचयज्ञ कर्मात खर्च केला पाहीजे.हि सत्कर्मे करणे म्हणजे आपल्या सुखाची पेरणी करणे.— धर्मग्रंथ.

     प्रत्येक जन्माला येणारा जीवात्मा खालील पाच ऋणे { कर्ज } घेवूनच जन्मला येतो या पाच ऋणातून मुक्तता करून न घेणारा पाप जोडून निश्चित जन्मोजन्मी दु:खच भोगतो.


पाचऋण म्हणजे पंचयज्ञ होय.

१} देवऋण        (देवयज्ञ)

२} ऋषीऋण      (ब्रह्मयज्ञ)

 ३}पितृऋण       (पितृयज्ञ

 ४} मनुष्यऋण   (मनुष्ययज्ञ)

 ५} भूतऋण       (भुतयज्ञ)


 

1} देवयज्ञ :

   शिवलिंगास जलाभिषेक करणे,एकादशी करणे, सोमवार करणे.रोज सायंकाळी / सकाळी एक चमचा शुध्द गायीचे तूप अग्नीमध्ये टाकुन आहुती म्हणुन देणे,तीळ,जव,सातु इ. (विशेषता पोर्णिमेला)तसेच स्वयंपाकातील शुध्द आहारातील नैवैद्य आग्नीला अर्पण करणे. कुलदेवतेचे कुलाचार करणे.वास्तु देवतेला आमावस्येला नारळ वाढविणे.


2} ब्रह्मयज्ञ :

 कलीयुगात शुध्द ज्ञान देणार्‍या *मूळ वैदीक ग्रंथाचे व संतांच्या ग्रंथाचे वाचन करणे,तरच सत्य समजेल* रोज आराध्य देवतेचा मंत्र जप करणे. सत्संग करणे, श्रवणातील संत विचार आचरणात आणणे.


3} पितृयज्ञ :

रोज एक घासभर अन्न दुपारी केंव्हाही कावळयाला दयावे. याला काकबली म्हणतात. पितरांचे श्राध्दकर्म  यथाशक्ती करावे. तसेच त्यांचे पित्यर्थ गोदान करणे,गाईला चारा दान करणे, चारा भरविणे.


4} मनुष्ययज्ञ :

  साधू, संत , महात्मा ,गरजवंत स्त्री- पुरूष यांना अन्न, वस्त्र दान करणे. आपल्या कुळातील लोकांना मदत करणे. गरीब घरातील मुलींच्या विवाह कार्याला मदत करणे.(यातुनच आहेराची प्रथा दृढ झाली आहे) अंत्य संस्काराला मदत करणे.


5} भूतयज्ञ :

  पक्ष्यांना अन्न-पाणी देणे,कुत्र्याला घास देणे ,गौमातेला घास-नैवेद्य देणे अथवा एक लहान पिंपळाच्या बुंद्यात मुंग्यांकरिता साखर टाकणे.वरील पंच महायज्ञ केल्याने जन्मजन्मांतरीचे "ऋण, वैर , हत्या "यांचे सर्व दोष कमी होऊन नर्क यातना नाश पावतात.हाच मानवाचा कर्तव्य धर्म आहे,हे केल्याने देवता व पितरांचे आर्शीवाद प्राप्त होवुन यश प्राप्ती होऊन सर्व प्रकारचे कौटुंबिक सुखासाठी परस्थिती अनुकूल होते,मानवजातीचे कल्याण आणि धर्म,संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी अवश्यक असणार्‍या, संपुर्ण ज्ञानाचे मार्गदर्शन करणारे ग्रंथ.जनकल्याणासाठी व आत्मकल्याणासाठी कुंटुबातील सर्वांनी अभ्यासावेत.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने