2022-23 संच मान्यताबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांचे दिनांक 24 नोव्हेंबर 2022 चे पत्र.

2022-23 संच मान्यताबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांचे दिनांक 24 नोव्हेंबर 2022 चे पत्र.


महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांचे स्वाक्षरीने दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमितपत्रानुसार संच मान्यता सन 2022 23 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

दिनांक 23 नोव्हेंबर 2022 च्या पत्रांमुळे सन 2022 23 च्या संच मान्यतेसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2022 ऐवजी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी ची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे.

त्यानुसार माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका व प्रशासन अधिकारी नगरपालिका महानगरपालिका सर्व यांना त्यांचे अधिनिस्त सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सरल प्रणालीमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थी अपग्रेड करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थी संख्या अपक्रेड करण्याबाबतची कार्यवाही दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत न झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.

याचा अर्थ यावर्षी 30 सप्टेंबर 2022 ही दिनांक संचमान्यतेसाठी ग्राह्य नसणार असून ती दिनांक दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ही असणार आहे.

सरल पोर्टल वर विद्यार्थी ट्रान्सफर डिटॅच अटॅच करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी अजूनही 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत मिळाली आहे.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने