Mango tree plantation through leaves

 अंब्याच्या पानापासून अंब्याच्या झाडाची निर्मिती करण्याची पध्दत शिकूया....



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आंब्याच्या पानापासून आंब्याच्या झाडाची निर्मिती कशी करायची ते अतिशय मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत .
साधारणपणे आपण आंब्याच्या झाडाची निर्मिती ही त्याच्या बियांपासून म्हणजेच आंब्याच्या कोयी पासून केलेली आपण पाहिलेली आहे. तसेच आंब्याची कलम केलेली फांदी लावून सुद्धा आपण वेगवेगळ्या जातीचे आंब्याची झाडांची बांधणी करून आंब्याच्या झाडाची निर्मिती करू शकतो. परंतु आज या ठिकाणी आपण आंब्याच्या झाडाची निर्मिती ही त्याच्या पानापासून कशी होते हे पाहणार आहोत.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणेः-
1) दोन ते तीन पिकलेली केळी
2) कोरफड या झाडाचे पान
3) एक कुंडी
4) पुरेशी माती
5) पाणी
6) आंब्याची पाने
सर्वप्रथम आंब्याच्या फांदीपासून पाने वेगळी करून घ्यावी. त्यानंतर कोरफडच्या पानाचा आडवा काप घ्यावा. तसेच जे आपण पिकलेली केळी आणलेली आहे. ती अर्धा मधून कापून घ्यावी. नंतर कोरफडीचे पान कापलेल्या ठिकाणाहून जो कोरफडीचा गर निघतो तो गर पानांच्या देठांना लावून घ्यावा. तसेच चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे कोरफडीचा गर पानाच्या देठाला लावलेली पाणे अर्ध्या कापलेल्या केळीच्या मधोमध बसवावी संबंधित चित्र पुढे दाखवलेले आहे 




त्याप्रमाणे पानाची आणि केळीची रचना करावी.अशी सर्व पाने केळीमध्ये व्यवस्थित बसवून घ्यावी.  नंतर हि केळीमध्ये बसवलेली पाणे एका कुंडीत लावायचे आहेत. एक छोटी कुंडी घ्यावी त्या कुंडीमध्ये माती भरावी आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे केळामध्ये बसवलेली पाने व्यवस्थितरित्या त्या कुंडीत त्यांची लागवड करावी. 





नंतर थोडेशे शेणखत त्या कुंडीमध्ये घालावे. त्या कुंडीला पुरेसा ओलावा मिळेल,एवढे पाणी त्या कुंडीमध्ये सोडावे. नंतर काही दिवस त्या कुंडीला पाणी देत राहावे नऊ ते दहा दिवसानंतर त्या पानांच्या मातीत गाडलेल्या भागावर मुळे आलेली आपल्याला दिसतात. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या पानांना मुळे येतातमूळे




  अशी मूळे आलेल्या पानांचे आपण जर मातीत त्यांचे रोपण केले तर त्यापासून निश्चितच नवीन आंब्याचं झाड तयार होते.  अशा झाडांना देखील मूळ ज्या झाडाची ती पाने आहेत त्या झाडाला ज्या प्रकारे फळ लागतात, तसेच आंब्याची फळे त्या नवीन लागवड केलेल्या आंब्याला सुद्धा येतात. तर आहे ना मजेशीर पद्धत यासंबंधीचा व्हिडिओ जर आपणास पाहायचा असेल तर पुढील दिलेल्या क्लिक बटनला आपण क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता.




 धन्यवाद


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने