Marie Curie|मेरी क्यूरी|पहिले महिला नोबेल विजेत्या

 ||मेरी क्युरी||



       रेडियम चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये मादाम मेरी क्यूरी चे नाव आदराने घेतले जाते. मादाम मेरी क्यूरी यांना 1903 आणि 1911 साली नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. संपूर्ण विश्वात नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. 1903 साली त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा हेनरी बॅकवेरेल,श्री पिएरे क्युरी आणि श्रीमती मेरी क्युरी अशा तिघांना मिळून तो पुरस्कार मिळाला होता. तर दुसऱ्यांदा नोबेल पुरस्कार दिला गेला तेव्हा त्या एकट्याच महिला होत्या.

       त्यांना मिळालेला पहिला पुरस्कार हा भौतिकशास्त्रात तर दुसरा रसायनशास्त्र साठी होता. 1903 साली सर्वांचे लक्ष मेरी क्युरी यांच्याकडे लागले जगातील सर्व वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर विशेषांक काढले. वेगवेगळ्या समारंभात त्यांना सत्कारासाठी आमंत्रित केले गेले. पण मेरी क्युरी या तटस्थ होत्या. त्यांना एकांतप्रिय होता. त्यांच्या मते संशोधनाचे कार्य संपले नव्हते तर ते सुरू झाले होते. संपूर्ण जगात त्यांचे नाव वैज्ञानिक महिला, रेडियम महिला असे घेतले जाऊ लागले.
       पोलोनियम, रेडियम आणि रेडियोधर्मी विकारांचे ज्ञान ही त्यांची विज्ञानाला दिलेली फार मोठी देणगी आहे. त्यांच्या संशोधनात त्यांचे पती मिस्टर क्युरी ही सहभागी झाले होते. मेरी क्युरी यांचे विवाह पूर्ण जीवन अत्यंत कष्टातून गेले. आर्थिक संकटे त्रास अडथळे इत्यादी शी सामना करीत करीत त्यांना आपले संशोधन कार्य पूर्ण करावे लागले.

             मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी एका पोलीश कुटुंबात झाला. त्यांचे वडील वारसा येथील शाळेत भौतिकशास्त्राचे अध्यापक होते. वडील डॉक्टर स्लोदोवस्का हे जसे वैज्ञानिक होते. तसेच चांगले विद्वानही होते. त्यांना जर्मन, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, इंग्रजी इत्यादी भाषा येत होत्या. पण त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण होती. झारशाही च्या अत्याचारामुळे त्यांच्या मातृभूमी ती लोक अत्यंत त्रस्त होते. तेव्हा आपल्या मातृभूमीला मुक्त करण्याची इच्छा असणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल त्यांच्या मनात फार मोठी सहानुभूती होती त्यामुळे त्यांची नोकरीही गेली.
        मेरी क्युरी यांच्या आईचा कामाच्या ताणामुळे आणि आर्थिक ताणामुळे मृत्यू ओढवला. त्यावेळी मेरी क्युरी यांचे वय अवघे दहा होते. पण त्या घाबरल्या नाहीत. प्रयोगशाळेत त्या वडिलांबरोबर काम करीत. वैज्ञानिक प्रयोगाबद्दल त्यांना आवड निर्माण झाली. वडिलांनिही त्यांना वैज्ञानिक शिक्षण दिले. विज्ञानाबद्दल च्या अभिरुचीबरोबरच त्यांच्या मनात आपल्या मातृभूमी बद्दल ही प्रेम होते. तसेच रुढीबद्दल विद्रोह भावना होती. झारशाहीच्या क्रुरतेविषयी पोलीश लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. त्याने उग्र स्वरूप धारण केले गेले.क्रांतिकारकां च्या सोप्या सभेला ही त्या वडिलां बरोबर जात असत अशा सर्व परिस्थितीत त्यांना व्हर्साय सोडून पॅरिसला जावे लागले.

        व्हर्सायच्या शाळेत त्या परीक्षेत प्रथम आल्या. त्यांना सुवर्णपदक मिळाले आपल्या आईप्रमाणेच मेरीने कष्टामुळे आजारी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी एक वर्षासाठी तिला गावाला पाठवले. तिथे शेतात फिरणे, खेळणे, गाणी इत्यादीसाठी तिला वेळ मिळाला. पण त्यानंतरचे क्युरी चे जीवन म्हणजे एक तपश्चर्याच म्हणावी लागेल.
      त्यानंतर त्यांनी विज्ञानातील शोधासाठी आपले जीवन वाहून घेतले एका गरीब अंधाऱ्या वस्तीत तयार आहात तेथे त्यांनी खाजगी शिकवण्या आणि प्रयोगशाळेत भांडी धुण्याचे काम करून पैसे मिळवली त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले कधीकधी अर्धपोटी ही रहावे लागेल जीवनातील त्यांची कठोर साधना पाहून आणि विज्ञानातील अभिरुची पाहून त्यांच्या प्राध्यापकांची लक्ष तिच्याकडे गेल
त्या वर्गात नेहमी पहिल्या बाकावर बसत आणि व्याख्यान झाले की निघून जात.कोणाशीही फार बोलत नसत. भौतिक, रसायन, गणित इत्यादी शास्त्राप्रमाणे त्यांनी संगीत, ज्योतिषशास्त्र, काव्य इत्यादीचा ही अभ्यास केला होता.भौतिक व गणित शास्त्रात त्यांनी एम. एस.सी केले. तिच्या प्राध्यापकांनी पिएरे क्युरी या संशोधकाची तिची ओळख करून दिली. फ्रान्समधील वैज्ञानिकांमध्ये त्यांना फार मोठे स्थान होते. ते दोघेही उत्साही प्रतिभावान आणि विज्ञानप्रेमी होते. विज्ञान आणि मानवता यांच्या हितासाठी दोघेही एक झाले. 1895 साली 36 वर्षीय पिएरे क्युरी 28 वर्षीय मेरी यांचा विवाह झाला.

       दोघांचे संशोधन चालू होते मेरीला दोन मुली झाल्या.दोघे वैज्ञानिक चर्चा करीत. मेरी क्युरी यांनी संशोधनात डॉक्टरेट पदवी संपादन केली. दोघांनीही ''रेडीओअँक्टिव्हिटी'' बाबत संशोधन केले. 1898 साली त्यांनी 'रेडियम' चा शोध लावला. पण त्याचे परीक्षण करावे लागणार होते. त्यासाठी दोघांनी खूप कष्ट घेतले आणि 1902 साली एक टन कच्च्या धातु मध्ये त्यांना एक चमचा (काही मिलीग्राम) रेडियम प्राप्त झाले. त्यातून निर्माण होणारी किरणे ही फार प्रभावी होती. की त्यामुळे मिस्टर क्युरी यांचे हात भाजले. त्यांना त्या संशोधनाबद्दल लंडनच्या रॉयल संस्थेने ''डेवी'' पदक दिले. अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले. रेडियम हा जगातील सर्वोत्तम मौल्यवान धातू आहे. त्याचे मूल्य एक ग्रॅमला एक लाख पन्नास हजार डॉलर.त्यांनी या संशोधनाची पेटंट घेतले असते तर त्या खूप श्रीमंत झाल्या असत्या. पण त्यांनी आपले सर्व जीवन विज्ञान कार्यासाठी वाहून घेतले. मिस्टर क्युरी यांची विज्ञान अकॅडमीत अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांना सुसज्ज अशा प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली. पण पण 19 एप्रिल 1906 रोजी त्यांचे एका अपघातात निधन झाले. मॅडम मेरी क्युरी यांनी यानंतरही सातत्याने आपले विज्ञान क्षेत्रातील कार्य चालू ठेवले. 1911 साली त्यांना पुन्हा दुसरे नोबेल पारितोषिक मिळाले. 1914 साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी घायाळ झालेल्या सैनिकांची त्यांनी सेवा केली. फ्रान्समध्ये त्या प्रत्येक गल्लीत फिरत. 1934 आली त्या आजारी पडल्या टीबी, फ्लू, ॲनिमिया ची लक्षणे त्यांच्या शरीरात दिसू लागले. हळूहळू 'रेडियम पॉयझनिंग' शरीरभर पसरुन लागले व शरीर शेवटी थकले आणि या महान वैज्ञानिक महिलेचा अंत झाला. भौतिक सुख, प्रसिद्धी इत्यादी दूर ठेवून त्या एक साधे जीवन जगल्या.   अशा या थोर महान वैज्ञानिक होत्या.
               


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने