इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकिया सन २०२६-२७ नियमित कॅप फेरी १ सुधारीत वेळापत्रक अधिकृत पोर्टल लिंक.
जाहीर प्रकटन,
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. दिनांक २१/०५/२०२६ रोजी पर्यंत एकूण ९,९६,६९५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
दिनांक २१/०५/२०२६ रोजी पासून नियमित फेरी १ ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या फेरीमध्ये विद्यार्थी नोंदणी करीता दिनांक २१/०५/२०२६ ते २२/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये बदल करुन दिनांक २३/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत वाढवून देण्यात येत आहे. सदर फेरीचे सुधारीत वेळापत्रक सोबत जोडून देण्यात येत आहे.
विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.
अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in
ई-मेल आयडी - support@mahafyjcadmissions.in
हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे
स्थळः पुणे
दिनांकः २१ मे, २०२६
