भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार, "मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ करणे."

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार, "मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ करणे."





प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची

विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (Booth Level Officers) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२. मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांची महत्वाची भूमिका आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे विशेषत: मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इ. कामे करण्यात येतात. तसेच छायचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णत: अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (Electoral

Registration Officer) यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिठ्ठी (Voter Slip) वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इ. कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी

(BLO) करीत असतात. सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात.त्याकरीता दिनांक २६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या

निदर्शानुसार मतदार केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांना प्रतिवर्षी रु.६,०००/- या दराने मानधन

तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जावून केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी रु.१,०००/- वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते.

३.भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक २४.०७.२०२५ च्या पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रु.६,०००/- ऐवजी रु.१२,०००/- मानधन देण्याबाबत व प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेषसंक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता ) रु.१,००० ऐवजी रु.२,०००/- वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) प्रतिवर्षी रु.६,०००/- ऐवजी १२,०००/- (रु. बारा हजार फक्त) एवढे सुधारीत मानधन

देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांना, त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता ) रू.१,०००/- ऐवजी रु.२,०००/- या सुधारीत दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर सुधारित मानधन / वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनच्या उपरोक्त तरतूदी दिनांक ०१.०९.२०२५ पासून अनुज्ञेय होतील.

४. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च २०१५ - निवडणूका, १०३ - मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण, १३ कार्यालयीन खर्च, संगणक

संकेतांक २०१५००३२ या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून

भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.५०७ /व्यय-४, दि.०५.०८.२०२५,अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०९०१११३८५०७५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

अधिकृत शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.


CLICK HERE

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने