सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत MPSP चे निर्देश २७/१२/२०२४.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या पत्रकारानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरूप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सन २०२४-२५ मध्ये मे. पदमचंद मिलापचंद जैन यांचेकडून स्काऊट व गाईड या विषयास अनुरूप गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या कार्यालयाचे संदर्भ क्र. १ नुसार स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीच्या अनुरूप कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच या कार्यालयाचे दिनांक १३/१२/२०२४ रोजीच्या संदर्भीय क्र. ४ अन्वये स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
उपरोक्त बाब विचारात घेता, मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण यांचे निर्देशानुसार दिनांक २६ जानेवारी, २०२५ पर्यंत सर्व गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाची शिलाई पूर्ण करून गणवेशाचे वितरण करण्यात यावे. याकरिता आपल्या स्तरावरून सुयोग्य नियोजन करून येत्या ३ आठवड्यामध्ये सदरची कार्यवाही पूर्ण करावी, ही विनंती.
आर. विमला (भा प्र से)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयातून निर्गमित दि. 05 JUN 2024 रोजीच्या परिपत्रका नुसार १. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व, ३. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व. यांना सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत समीर सावंत प्रकल्प समन्वयक तथा राज्य सह संचालक (प्रशासन), म.प्रा.शि.प., मुंबई यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
१. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु. जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश संचाचा लाभ देण्यात येतो
२. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ पासून समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात न येणाऱ्या दारिद्रय रेषेवरील पालकांच्या मुलांना राज्य शासनाच्या योजनेमधून दोन शालेय गणवेश संचाचा लाभ देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.
३. सदर निर्णयानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे.
४. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्काऊटस् व गाईडस् विषयास अनुरुप एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे. याकरीता गणवेश कापड पुरवठादार यांचेकडून शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात कापड उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कापड पुरवठादाराकडू
५. स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवशाचे कापड उपलब्ध करुन देण्यात आले नंतर सदर गणवेशाचे कापड सुस्थितीत असलेबाबत तसेच विदयार्थी संख्येच्या प्रमाणात उपलब्ध झालेची खात्री संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.
६. इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचे हाफ शर्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets with sholder straps) देण्यात यावेत. तसेच इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांकरीता हाफ पॅन्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. हाफ पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फुल पॅन्टसाठी गडद निळ्या रंगाचे कापडाचा पुरवठा करण्यात येईल. फुल पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत.
७. पिनोफ्रॉक (One Piece) इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थीनींकरीता निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two top patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. कमीज इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थीनींकरीता आकाशी निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. तसेच सलवार गडद निळ्या रंगाचे (Dark Blue) कापड पुरविण्यात येणार आहे.