अपार आयडी कार्ड कसे डाउनलोड करावे?
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वांनी अपार मेहनत करून विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट केलेले आहेत सदर आपार आयडी क्रमांक आपल्या यु-डायस प्लस पोर्टलवर दिसत आहे परंतु त्या ठिकाणी आपार आयडी कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध नाही तर मग प्रत्येक विद्यार्थ्याचे अपार आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे हे या ठिकाणी समजून घेणार आहोत सदर माहिती समजून घेण्यासाठी सर्वप्रथम सर्व खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी तदनंतर या पोस्टच्या शेवटी सदर वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून प्रत्येक जण स्वतःच अपार आयडी कार्ड डाऊनलोड करून संग्रही ठेवू शकतो.
सर्वप्रथम आपल्या फोन मधील गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करावे त्या ब्राउझरमध्ये Digilocker असे टाईप करून सर्च करावे त्यानंतर आपणास पुढील प्रकारची स्क्रीन दिसेल त्यामध्ये गोल केलेल्या वेबसाईटला क्लिक करावे.
वरील फोटोतील स्क्रीन मधील डीजी लॉकर यावर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील स्क्रीन दिसेल.
वरील स्क्रीनवर दिसत असलेल्या साईन इन बटन वर क्लिक करावे साइन इन बटन वर क्लिक केल्याच्या नंतर पुढील स्क्रीन आपल्या मोबाईलवर येईल.
वरील स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण मोबाईल क्रमांक टाकून किंवा युजरनेम टाकून किंवा आधार कार्ड क्रमांक टाकून साइन इन करू शकतो मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकून साइन इन करणार आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे तदनंतर आपल्या मोबाईलवर पुढील स्क्रीन दिसेल.