शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत.

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत.



 

संदर्भ : समक्रमांकित शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६.शालेय विद्यार्थ्यास एका जिल्ह्यातून अथवा राज्यातून, दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यातील शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास तसेच CBSE / ICSE / IGCSE / IB या मंडळातील शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा झाल्यास अथवा राज्य मंडळाशी संलग्नित शाळेतून अन्य मंडळाशी संलग्नित शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास, सध्या प्रचलित असलेल्या कार्यपध्दतीनुसार, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ( प्रमाणपत्रावर ) शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. ही पध्दत केवळ ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत, ती शाळा अधिकृत व मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी होती.तथापि सदर पध्दत बंद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नमुना सुधारितकरण्यात आला असून यामध्ये शाळा मान्यता क्रमांक तसेच युडायस क्रमांक यांचा उल्लेख असल्यामुळे शाळांच्या अनधिकृततेचा प्रश्न निकालात निघाला आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला हा संबंधितशाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची उपरोक्त नमूद पध्दत बंद करण्यात येत आहे. हा शासन निर्णय सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७०५३०१२३३०५८५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(डॉ. सुवर्णा सि. खरात)

सहसचिव, महाराष्ट्र शासन


सदर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

                      Download 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने