केंद्रप्रमुख संवर्गातील रिक्त पदासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्रा.) शिक्षक पात्र

केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीचे रिक्त पदे जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान 6 वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा शिक्षकामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने भरणेसाठी पात्र शिक्षकांची माहिती सादर करणे बाबत.




संदर्भ :- 1) शासन निर्णय क्रमांक पीआरई 1094/704/(एक) /प्राशि-1 दिनांक 14 नोव्हेंबर,1994

2) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र.81/ टिएनटि-1 दि.01/12/2022

3) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र.81/ टिएनटि-1 दि.27/09/2023

4) ग्राम विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.220/आस्था-14 दिनांक 27/12/2023


उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक (02) अन्वये केंद्रप्रमुख संवर्गातील 50 टक्के पदे पदोन्नतीने भरणे बाबत धोरण निश्चित केलेले आहे. संदर्भ क्रमांक (03) नुसार केंद्रप्रमुख पदोन्न्तीने नियुक्तीसाठी ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक(प्राथमिक) या पदावर किमान 6 वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. अशी तरतूद आहे.त्या अनुषंगाने केंद्रप्रमुख पदोन्नतीचे रिक्त पदे भरणेसाठी संदर्भ क्रमांक (03) व (04) मधील तरतूदी विचारात घेवूनजिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान 6 वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा संधीपात्र शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसेच सेवाविषयक माहितीचा तपशिल या पत्रासोबत दिलेल्या विहित प्रपत्रामध्ये सादर करावा.त्या अनुषंगाने संधीपात्र शिक्षकांकडून या पत्रासोबत दिलेल्या विहित नमुण्यात वैयक्तिक माहितीचा तपशिल भरुन घेवून त्या सोबत आवश्यक कागदपत्र दिनांक 20/12/2024 पर्यंत मागविण्यात यावेत. संबंधिताकडून विहित कालावधीत प्राप्त माहितीची आपल्यास्तरावर पडताळणी करुन विहित नमुण्यामध्ये माहिती Unicode फॉन्टमध्ये आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 24/12/2024 पर्यंत सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी मध्ये सादर करावी. कोणताही कर्मचारी वंचित राहणार नाही व चुकीची माहिती सादर होणार याची दक्षता घ्यावी. विलंबास व चुकीच्या माहितीस आपणास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.


शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 


                          Download 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने