परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी विषयावर आणि क्षमतावर प्रश्नपेढी...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलानुसार यापुढे इयत्ता तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांचीच संपादणूक चाचणी होणार आहे. भाषा, गणित आणि सामाजिकशास्त्र व परिसर अभ्यास या तीन पेपरमधून चाचणी होईल. यंदा प्रथमच परीक्षेसाठी कोकणी या प्रादेशिक भाषेचा समावेश करण्यात आला असून २५ प्रादेशिक भाषांमधून परीक्षा होणार आहे. ४ डिसेंबरला देशभरात एकाचवेळी ही चाचणी होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून दरवर्षी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणी घेतली जाते. त्यात विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेले शिक्षण किती आकलन झाले, याची पडताळणी होते. आता नवीन बदलानुसार तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणी घेतली जाणार असून त्याचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पार पडले आहे.
‘एनसीईआरटी’च्या माध्यमातून राज्यातील ‘एससीईआटी’ व जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने (डायट) ४ डिसेंबरला ही चाचणी पार पडेल. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १२० शाळांमधील ३६०० विद्यार्थ्यांसह देशभरातील तब्बल २५ लाख विद्यार्थी असणार आहेत. यातील शाळांची निवड ही यु-डायसवरील माहितीवरून थेट केंद्र स्तरावरून केली जाते. ही जगातील सर्वात मोठी सॅम्पल चाचणी असणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होतील. तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय तथा घटकांचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे.
ठळक बाबी...
नववी व सहावीच्या विद्यार्थ्यांची यंदा प्रथमच संपादणूक चाचणी. तिसऱ्याच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच सहावीतील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित आणि सामाजिकशास्त्र व परिसर अभ्यास हे विषय असतील. पूर्वी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषय स्वतंत्र होता. आता नववीच्या विद्यार्थ्यांना तो विषय स्वतंत्र नसेल. सामाजिकशास्त्र व परिसर अभ्यासाच्या विषयातच विज्ञान समाविष्ट असेल.
वस्तुनिष्ठ ४५ प्रश्न असतात (प्रत्येक पेपरचे १५ प्रश्न). विद्यार्थी संपादणूक चाचणी यंदा २५ प्रादेशिक भाषांमधून होईल. त्यात कोकणी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. कोकणातील शाळा यात असतील तर तेथील विद्यार्थ्यांना कोकणी भाषेतून परीक्षा देता येईल.
तीन पेपर सोडून शाळा, वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नावली देवून ती त्यांच्याकडून भरून घेतली जाणार आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाऐवजी आता समग्र प्रगती मूल्यमापन पद्धती असणार आहे. त्यात विद्यार्थी, त्याचे मित्र, शिक्षक, पालकांचाही समावेश असेल.
४ डिसेंबरला ही परीक्षा होईल
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच तिसरी, सहावी व नववीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचणी होईल. जवळपास २५ प्रादेशिक भाषांमधून ही चाचणी देता येणार आहे. देशभरातील २५ लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पडताळणी या चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. ४ डिसेंबरला ही परीक्षा होईल.
- डॉ. जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
फरक राष्ट्रीय सर्वेक्षण चाचणी साठी सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याकडून सोडून घेण्यासाठी उपलब्ध आहेत,त्या डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
सदर सर्वेक्षणासाठी कोरी OMR SHEET डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.