आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे चेक करा अन्यथा आपणास होऊ शकतो दंड! Check How Many Sim cards are registered on your own name?
नमस्कार मित्रांनो,
मी आज आपणास सोबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करत आहे ट्रायच्या निर्देशानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास मोबाईल सिम कार्ड खरेदी करता येते परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपर्यंत बऱ्याच वेळेस विविध ऑफरच्या आहारी जाऊन अनेक सिम कार्डची खरेदी केलेली असते परंतु ट्रायच्या निर्देशानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास नऊ पेक्षा जास्त सिम कार्ड स्वतःच्या नावावर खरेदी करू शकत नाही आणि असे जर झाले तर आपणास नवीन शासन नियमानुसार 30,000 ते 2,50,000 पर्यंत दंड होऊ शकतो त्यामुळे आपल्या नावावर आपण खरेदी केलेली तसेच आपले कागदपत्रे वापरुन दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केलेले मिळून किती सिम कार्ड आहेत.हे पुढील प्रोसेस ने आपण चेक करुन शकता.
त्यासाठी सर्वप्रथम
www.sancharsathi.com
या पोर्टलला भेट दिल्यानंतर पुढील स्क्रीन आपल्याला दिसेल.
Know your mobile connections
ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनला क्लिक करा. वरील ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल.
वरील स्क्रीन मध्ये आपला दहा अंकी कार्यरत असलेला मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर त्याखाली दिसत असलेला कॅपच्या कोड इंटर करून व्हॅलिडेट कॅपच्या वर क्लिक करा. कॅपच्या कोड व्हॅलीडेड झाल्यानंतर आपल्या इंटर केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इंटर करा आणि नंतर लॉगिन बटन वर क्लिक करा. लॉगिन झाल्याच्या नंतर पुढील स्क्रीन आपल्याला दिसेल.
संचार साथी या शासकीय पोर्टलला भेट देण्यासाठी पुढील क्लिक बटन वर क्लिक करा.
वरील संपूर्ण माहितीचा डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.