राज्य सरकारी कर्मचार्याच्या सेवा उत्पादन म्हणजेच ग्रॅच्यूटीच्या रकमेत घसघशीत वाढ...
आज सरकारने कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत आज अनेक मोठमोठे निर्णय होणार अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. महत्त्वाचे म्हणजे झाले देखील तसेच.
आजच्या बैठकीत सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून सेवा उपदानाची रक्कम वाढवण्यात आली आहे. सेवा उपदान म्हणजेच ग्रॅच्यूटीची रक्कम लाखो रुपयांनी वाढली असून याचा राज्यातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
खरंतर आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तसेच कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपये एवढा आर्थिक लाभ दिला जात होता. सेवा उपदान म्हणून आतापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना फक्त 14 लाख रुपये मिळत होते.
मात्र आता या निधीमध्ये तब्बल सहा लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांना वीस लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. सेवा उपदानाच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन २० लाख रुपये करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे पुढील तीन वर्षात सरकारी तिजोरीवर 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
तथापि येत्या काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचा राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.