केंद्रप्रमुख पदोन्नती करिता शिक्षण संचालक यांनी शिक्षणाधिकारी यांना केलेले मार्गदर्शन परिपत्रक | Kendrapramukh pramotion

केंद्रप्रमुख पदोन्नती करिता शिक्षण संचालक यांनी शिक्षणाधिकारी यांना केलेले मार्गदर्शन परिपत्रक 


 

शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक आठ मे 2023 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना केंद्रप्रमुख पदोन्नती करिता मार्गदर्शनपर पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.उपरोक्त संदर्भीय पत्र क्र. ३ नुसार आपल्या कार्यालयामार्फत केंद्रप्रमुख पदोन्नती विषयक मार्गदर्शन मागविले आहे. राज्यातील केंद्र प्रमुख भरती प्रक्रीये संदर्भात दि. ०१-१२-२०२२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखांची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५०% पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत "भरण्यात येतील व दिनांक ०९/०३/२०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल." असे निर्देश आहे.दिनांक ०१-१२-२०२२ पूर्वी केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात निघालेल्या सर्व शासन निर्णय/ शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करून दि. ०१-१२-२०२२ रोजीचा शासन निर्णय अंतिम करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयात विषया संबंधित कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच शासन शुद्धिपत्रक दि.०९/०३/२०२३ नुसार पदोन्नती करीता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहेत.
त्यामुळे शासन निर्णय दिनांक ०१ / १२ /२०२२ व शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ अन्वये नियमानुसार 

संबंधित परीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.पदोन्नती विषयक कार्यवाही करावी.


 

         Download 

 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने