जीवनाचे सार -मराठी बोधकथा|नैतिक कथा|moral story -2

 जीवनाचे सार -बोधकथा




 

एक  दिवस शाळेला सुट्टी असल्याची  घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलांच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलांच्या कामाचे निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार  पाच  वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का?  याचे उत्तर त्याच्या  वडीलांनी  दोन ओळीत दिले  त्यात पूर्ण  जीवनाचे सार सांगितले  ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते  कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.


🌀तात्पर्य_ ::~

                    जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही. आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळला.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने